अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
| महाड | वार्ताहर |
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांमध्ये संपादित झालेल्या जमिनीचे आणि घराचे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी महिलेलाच्या बेजबाबदार पणामुळे वन वन भटकण्याची पाळी आली आहे. गेली दीड वर्षे ही महिला प्रांताधिकारी आणि महामार्ग विभागाच्या कार्यालयाच्या वाऱ्या करून हैराण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली दशकापासून सुरू आहे. करोडो रुपये खर्च करून देखील हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही यामुळे वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थ प्रचंड त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून भूसंपादन करताना अनेक चुका केल्यामुळे आजही मोबदल्यापासून शेतकरी वंचित आहेत. या शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. महाड तालुक्यातील नांगलवाडी गावातील ज्योती मंगेश घोणे ही महिला गेली दीड वर्ष आपल्या घराचे आणि जमिनीच्या उर्वरित मोबदल्यासाठी महाड उपविभागीय अधिकारी आणि महामार्ग विभागाच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून मोबदला का रखडला आहे याचे स्पष्ट कारण दिले जात नाही.
ज्योती मंगेश घोणे यांचे घर आणि जमीन महामार्गाच्या कामामध्ये संपादित करण्यात आली महामार्गाचे पूर्ण काम करण्यासाठी ज्योती मंगेश घोणे यांचे घर रस्त्याच्या कामामध्ये आडवे येत असल्याने ते तत्काळ तोडणे आवश्यक होते याकरिता एल अँड टी कंपनीने घर खाली करा तुम्हाला त्याचा मोबदला मिळवून देऊ असे सांगून घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केले मात्र घर सोडून दीड वर्ष झाले तरी अद्याप घराची रक्कम आणि जमिनीची उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही. जमिनीचा मोबदला बारा लाख 14 हजार हे मिळालेले असले तरी घर आणि पुनर्वसनाची रक्कम अद्याप दिली गेलेली नाही याकरता महाड उपविभागीय कार्यालयामध्ये ज्योती मंगेश घोणे या गेली दीड वर्ष फेऱ्या मारत आहेत जवळपास साडेआठ लाख रुपये शासनाकडून येणे बाकी असल्याचे ज्योती घोणे यांनी सांगितले.