भंगार गोदामाला भीषण आग

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील तळोजा परिसरातील रोहिंजण या ठिकाणी असलेल्या भंगार गोदामाला अचाकनपणे लागलेल्या आगीत येथील मालाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रोहिंजण टोल नाक्याजवळ असलेल्या भंगार गोदामाला शुक्रवारी सकाळी अचानकपणे आग लागली. आगीचे वृत्त समजताच तळोजा पोलिसांचे पथक त्याचप्रमाणे तळोजा व परिसरातील अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग विझविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. या आगीत मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या ठिकाणी अशा प्रकारच्या आग नेहमीच लागत असल्याने त्या भागात राहणार्‍या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. तरी शासनाने या ठिकाणी लक्ष घालून येथील भंगार गोदामे हलविण्याची मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.

Exit mobile version