आजपासून भुवनेश्वरला सराव शिबीर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भुवनेश्वर येथे 24 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या ज्युनिअर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य 24 खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली. या खेळाडूंचे सराव शिबीर उद्यापासून सुरू होत आहे.
सर्व खेळाडूंनी उद्या मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रिड आणि मार्गदर्शक बीजी करिअप्पा यांना रिपोर्ट करून मग सराब शिबिरास सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. ज्युनिअर खेळाडूंचे प्राथमिक शिबीर बंगळुरु येथील साईच्या शिबिरात काही महिन्यांपूर्वी पार पडले होते. त्यातून हे संभाव्य 24 खेळाडू निवडण्यात आले आहेत. आता जेथे स्पर्धा होणार आहे, त्या कलिंगा हॉकी स्टेडियमवर खेळण्याचा सराव व्हावा म्हणून त्याचे शिबीर येथे आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय संघ गतविजेता असून, त्यांचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. या गटात कॅनडा, फ्रान्स आणि पोलंड यांचा समावेश आहे. अ गटात बेल्जियम, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आणि चिली. क गटात नेदरलँड, स्पेन, कोरिया, अमेरिका तर ड गटात जर्मनी, अर्जेंटिना, पाकिस्तान आणि इजिप्त यांचा समावेश आहे.
भारताचा संभाव्य संघ : पवन, प्रशांत कुमार चौहान, साहिल कुमार नायक, संजय, यशदीप सिवाच, श्रद्धानंद, तिवारी, अभिषेक लाक्रा, मनजीत, दिनाचंद्र सिंग, मोरिंगथेम, सुनील जोजो, सायरल लुगन, विवेक सागर प्रसाद, रबिचंद्र सिंग, विष्णुकांत सिंग, गुरमुख सिंग, अंकित पाल, मारीस्वरन साकिथवेल, उत्तम सिंग, मनिंदर सिंग, अरजीत सिंग, संदीप चिरमाको, राहुल कुमार राजभर, बॉबी सिंग धामी आणि प्रभज्योक सिंग.