दत्ता कोकळे यांचा सन्मान

| नागोठणे | वार्ताहर |
आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश बामुगडे व महेश बामुगडे यांच्या टीमकडून भारतीय सैनिकांचा सत्कार करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून सुकेळी धनगरवाडीतील सैनिक व सध्या आसाम येथे भारत व चीन सीमेलगत देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले दत्ता विठ्ठल कोकळे यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने स्वीकारण्यात आला. कोकळे यांचा सत्कार बंधू सुनिल कोकळे यांच्याकडे शाल,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून प्रदान करण्यात आला.यावेळी निवास पवार, रुपेश बामुगडे, महेश बामुगडे व त्यांची संपूर्ण टीम सुकेळी येथे उपस्थित होती.

Exit mobile version