| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कमळाकर वाघमोडे यांचा गुरुवारी (दि.1) अलिबागमध्ये सन्मान करण्यात आला. महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने हा गौरव करण्यात आला.
कमळाकर वाघमोडे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्यावेळी श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला. भजनी बुवा सुजित देशमुख यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी भगत, देशमुख, पी. के. पाटील, आदी मान्यवरांसह बँकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच भजनीप्रेमी उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना कमळाकर वाघमोडे म्हणाले की, शब्दाला मान देऊन गेली अनेक वर्षापासून महाडमधून येऊन भजनी मंडळी भजनाचा कार्यक्रम करतात. भजनी मंडळाचे योगदान मोलाचे राहिले आहे.
कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान
