। पाताळगंगा । वार्ताहर ।
रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागातील महिला कर्मचारी व महिला पत्रकारांचा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अल्टा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी बाळराम म्हात्रे, खोपोलीचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, उप पोलीस निरीक्षक रोहिदास भोर, पोलीस अधिकारी दिनेश भोईर, नगरसेवक निशांत पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखेडे, स्मिता तायडे, डॉ.रीना गायकवाड, डॉ.दिव्या परमार, स्टाफ नर्स राखी गिरी, डॉ.धनंजय तायडे, विनोद सोलंकी, महिला पत्रकार संतोषी म्हात्रे, सारिका सावंत, स्नेहल वालेकर, मानसी कांबळे आदी उपस्थित होते.