जंगलाची सुरक्षा रामभरोसे

वनसंपदेची प्रचंड हानी, वनखात्याचे दुर्लक्ष

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यात डोंगराना प्रचंड लावण्यात आलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील डोंगर अक्षरशः होरपळत आहे. तर सततच्या वणव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी होत आहे. सध्याच्या आधुनिकेतेच्या व तंत्रज्ञानाच्या जीवनात औद्योगिकीकरण व नागरीकरणाच्या नावाखाली जंगलेच्या जंगले भुईसपाट होताना दिसत आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे वनविभागने दुर्लक्ष होताना दिसत आहे.

दरम्यान, रोज कुठे ना कुठे तरी आग लावण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्यात अधिक भर पडत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे, वनसंपदा मिळवणे यासाठी वणवे लावले जात असूनही वानखाते मात्र निद्र अवस्थेत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील खांब, कोलाड, देवकान्हे, निवी, तळवली, लाढर, ताबंडी मेढा, जंगल परिसरात भरदुपारी वणवा लागून मोठ्या प्रमाणात वनराई जळून खाक झाली आहे.

रोहा तालुक्यातील विपुल वनसंपदा लाभलेल्या डोंगरांना लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदे बरोबरच प्राणी, पशु-पक्षी यांच्या वास्तव्यावर गदा येत आहे. एवढे सगळे होत असताना वनखाते मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

Exit mobile version