माणगावात अन्नत्याग आंदोलन सुरु

| माणगाव | प्रतिनिधी |

केवळ श्रीवर्धन नव्हे तर रायगड जिल्ह्यातील उर्वरित सर्वच 14 तालुक्यांतील शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला असून, या कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांवर आज घडीला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. या प्रमुख मागणी संदर्भात माणगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे बुधवारी (दि.28) सकाळी अन्नत्याग आंदोलन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. या अन्नत्याग आंदोलनासाठी पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सज्जाद डावरे, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संताजी पवार, माणगाव तालुकाध्यक्ष राजू रोडेकर, महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, तळा तालुकाध्यक्ष अजहर कुरुक्कर, अलिबाग तालुकाध्यक्ष साईनाथ म्हात्रे, अश्विनी ठाकूर, स्नेहा पाटील, सचिन पाटील, अबूबकर गोडमे, मकसूद हरगे, प्रवीण जाधव, रामदास कदम यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Exit mobile version