‘लाईट ऑफ लाईफ’च्या वतीने डिजिटल व्हॅनचे उद्घाटन

कर्जत । वार्ताहर ।
लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या आनंदो प्रकल्पांतर्गत शालोपयोगी साहित्य वाटप आणि डिजिटल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. या व्हॅनचा उपयोग शैक्षणिक उपक्रम, जादा तासिका, बाल कला महोत्सव आदींसाठी विद्यार्थ्यांना केला जाणार आहे.

दहिवली येथील जनता विद्यालयामध्ये डिजिटल व्हॅनचा उद्घाटन सोहळा व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कांचन थोरवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. पाहुण्यांचा परिचय वैशाली नेमाडे यांनी करून दिला. त्यानंतर लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या संस्थापक डॉ. विली डॉक्टर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून डिजिटल व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक विवेक दांडेकर, शालेय समिती सदस्य कृष्णा लाड, अमोल क्षीरसागर, रमेश दासवानी आदी उपस्थित होते.

यावेळी आनंदो प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांनतर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थित पाहुण्यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन वैशाली नेमाडे, तर आभार प्रदर्शन तानाजी खोमणे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका ज्योती घरत, डॉ. शारदा निवाते, राजश्री केदार, मोहिनी हजारे, प्रिया सोनावळे, शिला रांगणेकर, संगीता चंदने, सुनील शेंडे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
.
डिजिटल व्हॅन
या व्हॅनमध्ये वाय-फायची सुविधा असून, पंधरा संगणक त्यामध्ये आहेत. या संगणकाच्या आधारे शैक्षणिक माहिती, त्या-त्या इयत्तांचा अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना गुगलच्या सहाय्याने अधिक माहिती उपलब्ध असणार आहे.

Exit mobile version