। रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात नवनवीन कारखानदारी येत असल्यामुळे याठिकाणी कामानिमित्त मुंबई, नवी मुंबई, पनवेल, बेलापूर येथून प्रवासी ये-जा करत असतात. कोरोना काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने प्रवाशांचा वाढता कल लक्षात घेता रसायनी (वाशिवली) ते सीबीडी बेलापूर अशी बससेवा सुरू केली होती. परंतु, या बससेवेचे सुव्यवस्थित वेळापत्रक नसल्यामुळे रसायनी विभागात कमी प्रमाणात बससेवा उपलब्ध होत आहे. संध्याकाळच्या वेळेत येथे येणार्या प्रवासी वर्गाची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय रसायनीकडे येणार्या एनएमएमटीची बस स्त्यावर कोठेना कोठे बंद पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागते. परिवहन विभागाने प्रवासी वर्गाचा विचार करून रसायनीतील एनएमएमटी बसच्या फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.