। अलिबाग । वार्ताहर ।
चोरीचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले असून आता वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या पार्कींगमधून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. जेएसडब्ल्यु कंपनीच्या अलिबाग गेटसमोरील पार्कींगमधुन फिर्यादी रा.मानीभुते यांची मोटार सायकल ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. माणगाव मधील कडापे येथील प्राथमिक शाळेचे बाजुला कांदळगाव ते जिता जाणा-या रोडवर फिर्यादी रा.कडापे व साक्षीदार यांची मालकीचे गुरे कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गुरांना गुंगीकारक औषध देऊन चोरी करुन नेण्याचा प्रयत्न केला. वांगणी म्हसळा याठिकाणी फिर्यादी रा.मोरवणे यांच्या चुलत भावाच्या शेतातील किर्लोस्कर कंपनीचा बोअरवेल पाणी काढण्याचा पंप एकूण 5 हजार सहाशे पन्नास रुपये किंमतीचे सामान अज्ञात चोरटयाने चोरून नेले. याबाबत सदरच्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.