रानसई धरणाची उंची वाढवा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढवून गाळ काढला जावा, अशी मागणी शेकाप आ.जयंत पाटील यांनी लेखी प्रश्‍नाद्वारे सरकारकडे केली आहे.

याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लेखी प्रश्‍नाद्वारे त्यांनी सरकारकडे विविध प्रश्‍न उपस्थित केले आहेत. यामध्ये पाणीसाठा कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकासमध्ये तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साधल्याने पाणी साठवणुकीवर परिणाम होत असल्याचे त्यानी निदर्शनास आणले. रानसई धरणातील पाणीसाठा प्रस्ताव गेल्या वर्षापासून शासनानंबित आहे. यासाठी सरकारने काय उपाययोजना केली, अशी विचारणाही त्यांनी केली.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धरणाची रानसई धरणाची पाणी साठवण क्षमता 80 मी इतकी आहे. उपयुक्त पानीमा 8490 एवा असून व्यतिरिक्तच्या कालावधीसाठी बाष्पीभवन व इतर कारणामुळे सुमारे 7 दलघमी पाणी पुरवठ्यासाठी दरवर्षी उपलब्ध होतो. पाणीसाठा अपुरा असल्याने पूर्वी आठवड्यातून दोन टिक्स पाणीकपात असायची पण यावेळी सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषद यांचा आठवड्यातून तीन दिवस व इतर सर्व ग्राहकांचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा नियम महामंडळाने घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Exit mobile version