नियमानुसार पहिला सामना भारताने जिंकला

| डब्लिंग | वृत्तसंसथा |

भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी जिंकला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सात गडी गमावत 139 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 6.5 षटकांत दोन गडी गमावून 47 धावा केल्या. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला.

आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने शानदार फलंदाजी केली. त्याने नाबाद 51 धावा केल्या. कर्टिस कॅम्फरने 39 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय केवळ पॉल स्टर्लिंग आणि मार्क ॲडायर यांना दुहेरी आकडा पार करता आला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अर्शदीपला एक विकेट मिळाली. मात्र, अर्शदीप त्याच्या अखेरच्या षटकात चांगलाच महागात पडला. भारताकडून यशस्वीने 24 धावा केल्या. तिलक वर्मा खाते उघडू शकला नाही. नाहीत आणि संजू एक आणि ऋतुराज गायकवाड 19 धावांवर नाबाद राहिले. क्रेग यंगने सलग दोन चेंडूंत विकेट घेत आयर्लंडला सामन्यात परत आणले. प्रथम यशस्वी जैस्वालने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली, त्यानंतर टिळकही बाद झाला. जैस्वालने 23 चेंडूत 24 धावा केल्या. त्याने एक षटकार आणि तीन चौकार मारले. कर्णधार स्टर्लिंगने त्याचा झेल टिपला. त्यानंतर तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. यष्टिरक्षक टकरने त्याचा झेल टिपला.

बुमराहचे दमदार सुरुवात –
या सामन्यात आयर्लंड प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने 327 दिवसांनंतर पुनरागमन करत पहिल्याच षटकात अँड्र्‌‍यू बालबर्नी आणि लॉरन टकर यांना बाद करून आयर्लंडला धक्के दिले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने हॅरी टेक्टर आणि जॉर्ज डॉकरेल यांना बाद केले. पॉवरप्लेमध्ये चार गडी गमावून आयर्लंडच्या संघाला केवळ 30 धावा करता आल्या. यानंतर मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळला जाणार आहे.

ममी पदार्पणावेळी तणावत नव्हतो तर मला आनंद झाला होता. तो पुढे म्हणाला की, मज्यावेळी तुम्ही कर्णधार असता त्यावेळी तुम्ही तुमच्या कामगिरीपेक्षा इतरांचा जास्त विचार करत असता. ममला खूप चांगलं वाटत आहे. मी एनसीएमध्ये अनेक सेशनमध्ये गोलंदाजी केली. मी खूप काही मिस करतोय किंवा काही नवीन करतोय असं वाटलं नाही. याचे सर्व श्रेय हे एनसीएच्या स्टाफला जाते. त्यांनी मला चांगल्या मानसिकतेत ठेवले.

जसप्रित बुमराह, भारतीय कर्णधार
Exit mobile version