आशिया चषक 2023: भारताच्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

तिलक वर्माचे एकदिवसीय मालिकेत पदार्पण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ आशिया चषकात उतरणार आहे. आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असेल. त्यामुळे आशिया चषकात भारतीय संघ ताकदीने उतरला आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना संधी दिलेली नाही.

तसेच, तिलक वर्मा याला संधी देण्यात आली असून वनडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याशिवाय राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झालेले आहे. हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. प्रसिद्ध कृष्ण याला आशिया चषकात संधी देण्यात आली आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आशिया चषकासाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

Exit mobile version