| मुंबई | प्रतिनिधी |
एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय महिला संघाचा आणि मलेशिया महिला संघाचा सामना पार पडला. हा सामना पावसामुळे रद्द झाला असून भारतीय महिला संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
एशियन गेम्स 2023 महिला क्रिकेटमध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात पार पडला. या सामन्यामध्येही पावसानो खोडा घातल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे हा सामना15- 15 ओव्हर्सचा करण्यात आला होता, मात्र पावसाने मलेशियाच्या बॅटींगवेळी हजेरी लावली. अखेर पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघाने सेमीफानलमधील आपलं स्थान पक्क केलं आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटसाठी भारताचा संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कनिका आहुजा, उमा चेत्री (विकेटकीपर), अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर.