। पॅरिस। वृत्तसंस्था ।
भारतीय पैलवान अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बाजी मारली आहे. अमनने 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. भारताच्या अमन सेहरावतने प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 ने विजय मिळवला आहे. भारताचे हे या ऑलिम्पिकमधील सहावे मेडल आहे. भारताने मागील 4 ऑलिम्पिकपासून कुस्ती या क्रिडा प्रकारात मेडल जिंकण्याच परंपरा कायम ठेवली आहे. भारतीय पैलवान 2008 पासून 2024 पर्यंतच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत आले आहेत.
कुस्तीमध्ये कांस्यपदकापूर्वी त्याचे वजनही वाढले होते, त्यामुळे त्याने ते कमी केले. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अमनचे वजन जवळपास 61.5 इतके वाढले होते. जे त्याने 4.6 किलोग्रॅमपर्यंत कमी केले. अमनने सांगितले की तो रात्री जिममध्ये जॉगिंग केली. कुस्तीच्या आखाड्याच्या मध्ये घाम गाळला. विंडचीटर जॅकेट घातला आणि हे सर्व 2-3 तास केले. त्यामुळे वजन कमी झाले.