इंद्रायणी एकविरा पालखी सोहळा

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील स्वयंभू श्री इंद्रायणी एकविरा देवी यात्रा व पालखी सोहळा सोमवारी (दि.15) ते मंगळवारी (दि.16) या दरम्यान श्री इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट, कळंबुसरे ग्रामस्थ व मित्र मंडळाकडून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

कळंबूसरे येथील स्वयंभू इंद्रायणी एकविरा हे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. प्राचीन काळी पाच पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी कळंबुसरे डोंगरावर वास्तव्यास होते. तसेच, कार्ल्याची एकविरा देवी पण या ठिकाणी वास्तव्यास होती. एका दिवसात माझे देऊळ या ठिकाणी बांधा मी येथे वास्तव्यास राहीन असा आदेश एकविरा देवीने पाच पांडवांना दिला. पण एका दिवसात या ठिकाणी देऊळ बांधता आले नाही. देवीने देऊळ व इतर परिसर उध्वस्त केले. देवळाचे काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. या नंतर देवी कार्ला येथे स्थायिक झाली. देवीचे आज ही येथे वास्तव्य आहे. तसेच, देवी नवसाला पावणारी, मनातील ईच्छा पूर्ण करणारी म्हणून प्रचलित आहे. येथे चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Exit mobile version