अप्रगत मुलांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम

कर्जत प्राथमिक शिक्षकांतर्फे उपक्रमाचे उद्घाटन
। कर्जत । प्रतिनिधी ।

अप्रगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कर्जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे एक पाऊल पुढे अप्रगत मुलांचा दवाखाना या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील केंद्र खांडपे येथे शिक्षण परिषदेत ग्रुप ग्रामपंचायत खांडपे सरपंच, गिता पब्लिक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नमिता सुधाकर घारे यांच्या हस्ते अप्रगत मुलांचा दवाखाना या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शैक्षणिक विचार मंचावर केंदप्रमुख राजेंद्र आढाव, प्रमुख वक्ते निंबाजी गिते, मालू गायकवाड, माधवराव निकुंभ उपस्थित होते.
अध्ययनस्तर सद्यस्थिती पडताळणी करून खांडपे केंद्रात अक्षर स्तर व संख्या ज्ञान यावर प्रभावीपणे काम केले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट अप्रगत मुलांना प्रगत करणे असे असून ही कल्पना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक वेच्या गावित यांची आहे. कर्जत तालुक्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा या शिक्षकांच्या संघटनेने या उपक्रमास पाठिंबा दिल्याचे संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष मनोहर भोसले यांनी सांगितले. अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र आढाव व सचिव अभिजित वाणी उपस्थित होते.

Exit mobile version