मुलांच्या आकलनविषयक विकासासाठी सत्र
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शाळांसह गावागावांत एकात्म अभियान सुरु करण्यात आले आहे. पनवेल व उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर व शाळा अशा 52 संस्थानी गावातील 85 नागरिकांनी व साडेपाच हजार लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे. या अभियानात योग आणि ध्यानधारणा सत्रे, मुलांच्या आकलनविषयक विकासासाठी आवश्यक माहिती व सत्रे यांचा समावेश आहे. दरम्यान, या अभियानाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
पूज्य बाबूजी महाराज श्री रामचंद्र यांच्या 125 व्या जन्म दिवसानिमित्त शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय, राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आयुष विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने रामचंद्र मिशन व हार्टफुलनेस इन्स्टीट्यूटच्या मार्फत तसेच पद्मभूषण कमलेश पटेल यांच्या प्रेरणेने एकात्म अभियान साजरे करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी इन्स्टीट्यूटच्या अंतर्गत स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस व एम.जी.एम. मेडिकल कॉलेज नेरूळच्यावतीने डॉ. सुधीर कदम, डॉ. नितीन कदम, कुलगुरू डॉ. दळवी व अधिष्ठाता डॉ. नरशेट्टी व डॉ. संध्या खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग व रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुष्यमान आरोग्य मंदिर व शाळा यांचा सहभाग घेण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्या सहकार्याने पनवेल व उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिर व शाळा अशा 52 संस्थानी 85 गावातील नागरिकांनी व 5 हजार 500 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे. योग आणि ध्यानधारणा सत्रे, मुलांच्या आकलनविषयक विकासासाठी आवश्यक माहिती व सत्रे यांचा मोहिमेत समावेश आहे. पनवेल व उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खेडेकर व डॉ. इटकरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे व आयुषमान आरोग्य मंदिरांचे वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले. हार्टफुलनेस झोनल कॉर्डिनेटर डॉ. कपिल ठाकूर, स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस व हार्ट फुलनेस इन्स्टीट्यूटच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग व रोहा तालुक्यात येत्या 3 महिन्यात हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसच्या संचालिका डॉ. मानसी ठाकूर डॉ. नागावकर यांनी दिली.