। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आहार तज्ञ डॉ.लीना पेडणेकर, नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, महिला बालकल्याण समिती सचिव दिप्ती एरंडे, स्वप्नजा विरकूड, शुभ्रा कारभारी, नम्रता करडे, स्मिता मुरुडकर, सायली गुंजाळ, श्वेता विरुकुड, लीना पेडणेकर, कल्पना पेणकर, राजश्री गजने,मिनाक्षी गुंजाळ, सायली चोडणेकर, रिया मांढरे, सोनल विरकुड, नगरपालिका शाळेतील शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका, बालवाडी शिक्षिका मदतनीस आदी महिला वर्ग उपस्थित होता.
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात अशा अनेक रूपी आई बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जिच्यामुळे हे जग पाहायची संधी मिळाली तिचा कोणना एक दिवस असू शकत नाही उलट प्रत्येक दिवस हा तिचा आणि तिच्यामुळेचे असतो, असे महिला बालकल्याण समिती सचिव दिप्ती एरंडे यांनी केले.
चांगले आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप ही महत्वाची आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, ज्यात फळे, भाज्या, प्रथिने आणि पुरेसे पाणी पिया. रोज महिलांनी अर्धा तास तरी चालावे.मुलांना सफरचंद,केळी विविध फळे खाण्यास द्यावेत.पण मैद्याचे पदार्थ तसेच फ्रुटी, वेफर्स खायला देऊ नये.ते शरीरासाठी हानीकारक आहे. तरच आपलं आरोग्य चांगलं राहिलं असे मत डॉ.लिना पेडणेकर यांनी मांडले. एकविसाव्या शतकात समाजात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे मात्र लहान मुली महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही.तरी समाजानी पहिली मानसिकता मुली महिला विषयी बद्दली पाहिजे तरच महिला सक्षम राहु शकतात.आपण मुली मुलांना वाढवत असताना समानता पाहिजे.मुलांना सुरुवातीपासून चांगले संस्कार मिळाले तर कुठे ही अत्याचार होताना दिसणार नाहीत. असे मत दिपाली दिवेकर यांनी केलेयावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या बिस्कीट खाणे, स्ट्रॉने कागदाचे तुकडे उचलणे, काड्याने ग्लास उचलणे, संगीत खुर्ची असे विविध खेळात महिलांनी सहभाग नोंदुन महिला दिवस साजरा केला.
महिलांनी सक्षम होणे गरजेचे- ए.सी.पी.सविता गर्जे
दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार व शोषण आणि हिंसक वागणूक याला तोंड देण्यासाठी व आपले स्वसंरक्षण समर्थपणे करण्यासाठी महिलांनी सक्षम झालेच पाहिजे, आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सविता गर्जे यांनी केले. येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचा उद्देश व त्यामागची भूमिका महिला विकास मंचाच्या प्रमुख प्रा. दिपाली पाठराबे यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. श्रीवर्धनच्या नवनियुक्त पोलीस उपविभागीय अधिकारी सविता गर्जे आणि कोमसापाच्या युवाशक्ती अध्यक्षा व मानसशास्त्र समुपदेशक प्रा. पद्मजा कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कुटुंबात महिलांचे स्थान अनन्यसाधारण आहे महिला जेवढी निर्भीड सतेज व सुरक्षित असेल तेवढी ती महिला आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकते आणि त्यातून उद्याचा सुसंस्कृत भारत निर्माण होऊ शकतो वेगवेगळ्या परिस्थितीत महिलांनी विवेक ठेवून क्षणिक सुखाला बळी न पडता वाटचाल करावी, असे समुपदेशक प्रा. पद्मजा कुलकर्णी म्हणाल्या. डॉ. विवेक खरे यांनी स्त्री जीवनावरच्या कवितांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. पीएसआय धनश्री करंजकर यांनी सायबर गुन्हे या विषयावर विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे नैतिकतेच्या व संस्काराच्या चौकटीत राहून, समाज व्यवस्थेचे भान ठेवून स्त्रियांनी आपली वाटचाल केली तर ती नक्कीच सक्षम होईल आज साहित्य, क्रीडा, संगीत, गायन, शैक्षणिक, राजकीय व अंतराळ क्षेत्रात देखील स्त्रियांची प्रगती अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी काढले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य किशोर लहारे, प्रा.दिपाली पाठराबे, डॉ. निलेश चव्हाण, राजश्री लोहार, मृण्मयी भुसाणे, डॉ.कल्याणी नाझरे, सर्व प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी प्रयत्नशील होते.
चौलमध्ये जागतिक महिला दिन साजरा
जागतिक महिला दिनानिमित्ताने चौल प्रभागातील चौल क्रांती आणि सारथी ग्रामसंघामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अभियान कक्षामधून रिया पाटील उपस्थित होत्या.

दादर शाळा, चौल दादर शाळेतील शिक्षक आणि प्रभाग संघाचे अध्यक्ष अमृता पाटील, सचिव सानिया लिगम, जोया अष्टमकर व दर्शना तेलगे तसेच सर्वं ग्रामसंघातील महिला उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष व सचिव यांच्या तसेच व्यवसाय करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
गोंधळपाडा शाळेत महिला दिन
महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळपाडा येथे सर्व माता पालकांची सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षा रश्मी बाणे होत्या.

यावेळी वेश्वी केंद्रप्रमुख संजय पोईलकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत निपुण भारत अभियानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी निपुण लीडर मातांचा रश्मी राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन दीपक पाटील तर आभार निलेश वारगे यांनी मानले.
चोरढे शाळेत महिला दिन उत्साहात
आज महिला आहेत म्हणून आज आपले घर चालतं, इतर सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. दिवसभर घरात कष्ट करत राहून महिला घर चालवत असतात. या महिलांना एक दिवस आनंददायी वातावरण निर्माण व्हावं, यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी शाळा महिलांसाठी खास संगीत खुर्ची, महिला मार्गदर्शन शिबीर राबवले.
प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलांना साडी भेट दिली गेली. तरी या आनंददायी वातावरणात सहभागी होण्यासाठी 62 महिला उपस्थित होत्या. सरपंच तृप्ती घाग, उपसरपंच चंद्रकांत वाघे, ग्रामपंचायत सदस्य दैवता दूकले, रुपाली महाडिक, दीपा आंबलिकर, ग्रामसेवक चेतन मगर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुकन्या दुकले, उपाध्यक्ष, सदस्य, अंगणवाडी ताई, आशा वर्कर यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

प्रथम सर्व महिलांचा शाल, गुलाबाची फुले देऊन सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुकन्या दुकले यांस कडून गणपतीची फ्रेम शाळेला भेट स्वरूपात देण्यात आली. ग्रामपंचायतीतर्फे वेफर्स, समोसा असा खाऊ देण्यात आला. महिलांसोबत ग्रामस्थांनी शिक्षकांचा सत्कार केला. महिलांना मार्गदर्शन करताना प्लास्टिक, महिला सक्षमीकरण व इतर बाबींबाबत माहिती सांगण्यात आली. यानंतर सर्व महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली.
प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलांना साडी भेट देण्यात आली. सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला बक्षीस स्वरूपात चाळण, डबा, नेलकटर यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील एक चिठ्ठी निवडण्यास सांगण्यात आली. जी चिठ्ठी निवडले जाईल ती वस्तू खेळ खेळून त्यातून बाद झालेल्या महिलेला देण्यात आली. खेळ खेळून प्रत्येक महिलेला कोणतीतरी वस्तू भेट स्वरूपात मिळाली याचा आनंद महिलांच्या चेहर्यावर दिसत होता. महिला दिनानिमित्त महिलांना आनंद मिळवून शाळेच्या वातावरणाशी समरूप होता आले. शिक्षक व माता पालक यांच्याशी अशा उपक्रमातून समन्वय साधला गेला. सरपंच तृप्ती घाग, अध्यक्ष सुकन्या दुकले यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शाळा चोरढे मराठी व ग्रामपंचायत चोरढे यांनी संयुक्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत महिलांनी आभार मानले.
दोनशे वर्षांनंतरही समानतेसाठी लढा
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने शनिवारी उरणच्या गांधी चौकात जागतिक महिला दिन साजरा केला. 18 व्या शतकात महिलांनी आपल्या समान हक्कासाठी संघर्ष सुरू केला.

त्यामुळेच जगात महिलांना मतदानासह इतर अधिकार मिळायला लागले. हा महिला लढ्याचा विजय असला तरी दोनशे वर्षानंतरही महिलांना समानता मिळालेली नसून, त्यासाठीचा लढा सुरू असल्याचे वक्त्यांकडून सांगण्यात आले. अल्पवयीन आणि वृद्ध महिलाही यातून अत्याचाराच्या बळी ठरत आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने उरण एसटी स्टॅण्ड ते गांधी चौक अशी महिलांनी मिरवणूक काढली. यावेळी महागाई, बेरोजगारी, वाढत्या महिलांवरील अत्याचार बंद करा, समान कामाला समान वेतन, महिलांना समान हक्क द्या, आदी जोरदार घोषणाबाजी करून गांधी चौकात सभा घेतली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रमिला म्हात्रे, तर प्रमुख वक्त्या या जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील या होत्या. यावेळी कुंदा पाटील, सविता पाटील, कुसुम ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माणगावात नारीशक्तीचा सन्मान
माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्था सल्लागार संगीता बक्कम, रक्तदान शिबीर समिती सचिव सुप्रिया शिंदे, संस्था सदस्या सिद्धी दाखिणकर, आनम शेख, ज्योत्स्ना डिघे, विजयश्री कराड, रक्तदाता माधवी महाजन, अॅड.कविता ढाकवळ, शर्वरी मोरे, दिप्ती ढेपे, गौतमी गायकवाड, सुधा साळवी, अॅड.अपर्णा सावंत-चोरगे, अवंतिका पोटले, चेतना तेटगुरे, अॅड.स्वागता वाडकर, निकिता बरुरे, शामली जंजाल, सिद्धी लाड, सानिका ढवण, शिवानी बेनेरे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात रक्तदान का करावे या विषयावर माणगाव येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.गौतम राऊत यांनी मार्गदर्शन केले.