इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका

। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सोमवारी तातडीने इंझमामवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रीया करण्यात आली. या शस्त्रक्रीयेनंतर इंझमामची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.इंझमामला मागील काही दिवसांपासून छातीत कळा येत होत्या. प्राथमिक चाचण्यांचे सर्व अहवाल सामन्य आले. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचं निष्पन्न झाल्याचं ईएसपीएन क्रिकइन्फोने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या चाचणीनंतर इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्याने दिलीय.

Exit mobile version