चीनला आयपीएलचे दरवाजे बंद ?

| नवी दिल्ली |वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग 2024 ची बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच दुबईमध्ये मिनी लिलाव संपला, जिथे खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. आता बीसीसीआयने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आयपीएल 2024 साठी मुख्य प्रयोजकाचा शोध सुरू आहे, यावेळी बीसीसीआय चीनला मुख्य प्रायोजकत्व देण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्व मिळविण्यासाठी बीसीसीआयने काढलेल्या निविदेमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की, ज्या देशांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत त्यांना या निविदेत महत्त्व दिले जाणार नाही. मुख्य प्रयोजकत्वाची मूळ किंमत प्रति वर्ष 360 कोटी रुपये आहे, त्यानंतर बोलीच्या आधारे निविदा दिली जाईल. मात्र बीसीसीआयने कोणत्याही देशाचा किंवा ब्रँडचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

Exit mobile version