। मुंबई । प्रतिनिधी ।
समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्यावर आता इन्कम टॅक्स विभागानं मोर्चा वळवला आहे. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे 20 हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधी ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे.कुलाब्यातील कमल मेंशन या इमारतीत इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. या ठिकाणी अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचं कार्यालय आहे. तर वाराणसीत विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात छापेमारी झाली.