संजय राऊत यांची टीका
। मुंबई । प्रतिनिधी ।
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्लीत होत आहे. त्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संमेलनाच्या आयोजकांना फटकारले आहे. कोणाला कसेही पुरस्कार देत आहेत, यांचा साहित्याशी संबंध काय? हे मराठी साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले की, हे मराठी साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देत आहात. कोणचे कसेही सत्कार करत आहात. यांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करत आहात. तसेच, भाजपचा हा उपद्व्याप आहे. इथे मराठीची काय सेवा करणार आहात. महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणार्या लोकांचा सत्कार करत आहात त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.