अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांची उपस्थिती
। अलिबाग। प्रतिनिधी ।
जय संतोषी माँ सीएनजी पंप अलिबाग-पेण मार्गावर उभारण्यात आला आहे. या पंपाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.28) सायंकाळी वाडगाव फाटा येथे जल्लोषात करण्यात आला. अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विद्यमान अध्यक्ष अभिजीत पाटील, जयभवानी पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, व्यावसायिक सत्यजीत दळी, मंगेश म्हात्रे, अलिबागच्या नगरसेविका संजना कीर, तालुका चिटणीस अनिल पाटील, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, सीएनजी पंपाचे मालक मंगेश नाईक, प्रीती नाईक आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सीएनजीवर चालणार्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अलिबाग-पेण मार्गावरील वाडगाव फाटाजवळील सीएनजी पंपामुळे अनेक वाहनांना आधार मिळणार आहे. स्थानिक मराठी उद्योजक नाईक यांच्यावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भव्यदिव्य अशा उद्घाटन सोहळ्याचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे घेतला.