। बीड । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले असून, पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे, असं आव्हाड यांनी म्हटले आहे.
तसेच, गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे, याच्यावर हल्ले झाले, त्याच्या हत्या झाल्या. ज्या लोकांचा छळ झाला ते लोक वंजारी नाहीत का? तुम्ही लोकांचा छळ केला. तुम्ही लोकांना गुलाम केले, त्यांना राजकारणासाठी वापरले, असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीस फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणाचं ऐकत नाही. असे तर इन्सपेक्टर आहेत. शासकीय यंत्रणा पोखरली जात आहे. खरा आका धनंजय मुंडे हेच आहेत. 11 वर्ष एकच पोलीस एका ठिकाणी कसा? आका आणि काका दोन्ही इथेच बसतात, काहीही होणार नाही, असा हल्लाबोल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.