माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे यांचे ह्दयविकार झटक्याने निधन

| माणगाव | सलीम शेख |
माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक
जितेंद्र तुळशीराम वाटवे यांचे बुधवार दि.२० जुलै २०२२ रोजी सकाळी ६ वाजता राहत्या घरी वाकडाई नगर माणगाव येथे ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. म्रुत्यु समयी त्यांचे वय ५४ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने वाटवे कुटुंबियांबरोबरच माणगाव पोलिस ठाणे व मित्र परिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे.

कै.जितेंद्र वाटवे हे शांत,संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांंमध्ये पोलिस म्हणून सेवा बजावली. माणगावात ते आपल्या स्वभावामुळे सर्वांनाच परिचित होते. नुकतीच त्यांना साहयक पोलिस उपनिरीक्षक पदावरून पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली होती. बुधवारी सकाळी ६ वा. त्यांचे निधन झाल्याची माहिती माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सर्वत्र पसरताच अनेकांनी त्यांच्या वाकडाई नगर माणगाव येथील निवासस्थानी येऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले तसेच अनेकांनी त्यांचे मोबाईलवर स्टेटस ठेवून श्रध्दांजली अर्पण केली.

Exit mobile version