पाटणा | वृत्तसंस्था |
पत्रकार तथा आरटीआय कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. आता त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला असून मेडिकल माफियांनी त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात घडली असून त्याने काही बनावट रुग्णालयाचा पर्दाफाश केला होता. बुद्धीनाथ झा, असे या पत्रकाराचे नाव असून ते स्थानिक न्यूज पोर्टलसाठी काम करत होते. त्याने काही बनावट रुग्णालयाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर अशा रुग्णालयाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. तसेच या रुग्णालयाच्या नावांसह एक फेसबुक पोस्ट देखील त्याने लिहिली होती. त्याच्या दोन दिवसानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. तसेच घटनेचे वार्तांकन करताना देखील बुद्धीनाथला अनेक धमक्या येत होत्या. तसेच त्याला लाखो रुपये लाच घेण्याचे आमिष दाखवले गेले. पण, त्याच्या कामावर काहीच परिणाम झाला नाही.