| महाड | वार्ताहर |
प्रतिवर्षी श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून श्री शंभुछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती, राजधानी रायगड यांनी ‘महाराष्ट्रातील गडकिल्ले’ या विषयवार फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये महाडच्या कल्पेश गणेश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
किल्ले रायगडावर श्री शंभू छत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता. श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी समितीने गड किल्ले या विषयावर फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील अनेक तरुण आणि नामवंत फोटोग्राफरने सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाडच्या कल्पेश गणेश पाटील या तरुण फोटोग्राफरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक जय मावळे, तृतीय क्रमांक चिराग भंगाळे, उत्तेजनार्थ चेतन पालीवाल, उत्तेजनार्थ निखील महामिने हे ठरले. प्रथम क्रमांक काढणार्या स्पर्धकांस रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच स्पर्धेचे परिक्षण राष्ट्रीय अवॉर्ड विनर फोटोग्राफर श्रीकांत शिंपी यांनी केले.