कर्जत रोटरीतर्फे कर्तृत्वावान व्यक्तींचा सन्मान

| नेरळ | बातमीदार |

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कर्जत रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब कडून विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणार्‍या खेळाडू तसेच विद्यार्थ्यांनाच देखील सन्मान करण्यात आला.

नंदी बागेत आयोजित रोटरी सन्मान सोहळ्यात रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ.अनील परमार तसेच ए.जी.आविनाश कोळी, कर्जत अध्यक्ष सतीश श्रीखंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष पुरस्कार सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. रोटरी तर्फे कृषी, सेवा,सुरक्षा, पर्यटन, प्रशासकीय, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणार्‍या दहा कतृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

यामध्ये राजेंद्र मांडे-पोलीस, चंदन भडसावळे-कृषी, विनायक उपाध्ये-लष्कर, गुरुनाथ साठेलकर-अपघातग्रस्त, निलिकेश दळवी-कृषी यांत्रिकीकरण, नवज्योत देशमुख-क्रीडा, मयुरेश चौधरी-गोसेवा, नीलम कदम-समाजसेवा, दिलीप दाभोळकर-वाहन चालक सेवा, रुचा कृष्णकांत दरेकर-इंडियन आर्मी लेप्ट.ऑफीसर यांचा सन्मान करण्यात आला.

रोटरी क्लब कडून आयोजित केलेल्या गडकिल्ले स्पर्धा विजेते- प्रथम पारितोषीक – दिव्या धुळे, द्वितीय-वैभव हजगे, तृतीय- रविना कोंडीलकर, आणि उत्तेजनार्थ प्रविण गडगे तसेच रोटरीयन नंदन भडसावले,हुसेन जमाली यांचाही सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचलन प्रदीप गोगटे व सचीन ओसवाल व आभार प्रदर्शन रो.सुनील सोनी यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ.हेमा परमार, डॉ. प्रेमचंद जैन, रो अल्का कोळी, स्नेहा श्रीखंडे, कृषीविश्‍व संपादक विलास श्रीखंडे, ट्रेजरर अरविंद जैन, रो जीतेंद्र ओसवाल, रो योगेश राठी, दिपचंद जैन जीतेंद्र परमार, सुशांत ठकेकर, रामदास घरत, सूर्याजी ठाणगे आदी उपस्थित होते.

Exit mobile version