| पेण | प्रतिनिधी |
आज दि.21 रोजी कास्प रायगड युनिट पेण कार्यालय मध्ये कास्पच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिपालीत मुलांच्या समवेत डॉ. शरदचंद्र गोखले संस्थापक अध्यक्ष कास्प यांची 98 वी जयंती साजरी करण्यात आली. डॉ शरदचंद्र गोखले हे एक आंतरराष्ट्रीय किर्तीचे समाजशास्त्रज्ञ होते. कास्प, आंतरराष्ट्रीय लेप्रसी युनियन व आंतरराष्ट्रीय दीर्घायू युनियन या संस्थाचे ते संस्थापक विश्वस्त होते. तसेच केसरी या वृत्तपत्राचे ते संपादक होते. डॉ. गोखले हे मान्यवर लेखक होते. युनायटेड नेशन्स, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. गुरुवार 21 रोजी रायगड युनिट पेण येथे डॉ. शरदचंद्र गोखले यांच्या 98 वी जयंतीनिमित्त निवेदिता ठाकोर यांनी यांच्या कार्याची माहिती दिली.यावेळी गौरी उपाध्यय, कीरण कदम यांच्यासह मोठया संख्येने प्रतिपालीत मुल हजर होती.
कास्प यांची जयंती साजरी
