। खरोशी । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक पेण येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंघ प्रस्तुत शिवकालीन लाठीकाठी तलवार दांडपट्टा चालविण्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रम ऐतिहासिक पद्धतीने जुन्या चाली परंपरा जपत जतन करत पार पाडण्यात आला.
छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नाने आयोजित पेण तालुक्यामध्ये सलग चौथ्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी झाली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस वंदन व पालखीचे पूजन करून महाराजांच्या चौकातून पालखी काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थित अखिल भारतीय छावा संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष धनंजय घरत व स्वप्निल घरत, तसेच शिवतेज युवा फाऊंडेशन अध्यक्ष हेमंत पाटील, चैतन्य पाटील, नंदा म्हात्रे, दिलीप साळवी, सचिव दीपक संसारे, सहसचिव राजेंद्र ठाकूर, पेण तालुका महिला आघाडी अश्विनी ठाकूर, पेण उपतालुका उपध्यक्ष संजय भोईर, विजय ठाकूर आदी उपस्थित होते.