खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलची बाजी

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुका खोखो स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे मंगळवार व बुधवारी पार पडल्या. या स्पर्धामध्ये रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब शाळेने मुलींच्या 14 वर्ष व 17 वर्ष वयोगट प्रथम क्रमांक व 14 वर्ष मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवत बाजी मारली. रोहा तालुका खोखो स्पर्धा क्रीडा अधिकारी राजेंद्र हातनूर, सचिन निकम व तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये तालुक्यातील तीस शाळांनी आपला सहभाग नोंदवाला होता. तालुक्यातील सर्वच शाळांनी चित्तथरारक खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक मधुकर फसाळे, मुख्याध्यापक राजकुमार चेंडके, सानेगुरुजी विद्यानिकेतन नितीन गोरीवले, तालुका समन्वयक रविंद्र कान्हेकर, क्रीडा शिक्षक अमोघसिद्ध सुरवसे, पंच सुधीर जंगम, धनंजय महाडिक, सुनील थिटे, विशाल शिंदे, ज्ञानेश्वर पोटफोडे, विनायक चितळकर, गोविंद कवलगे, नरेश महाडिक, निलेश बिरगावले, नितेश म्हात्रे, भरत वारगुडे, समिता वाघमारे आदींसह शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14 वर्षे मुलांमध्ये प्रथम क्रमाक जिंदल माऊंट लिटेरा झी स्कुल सुकेळी, द्वितीय क्रमांक सानेगाव विद्यानिकेत सानेगाव, 14 वर्ष मुली प्रथम रा. ग. पोटफोडे खांब, द्वितीय क्रमांक एम. पी. एस. एस कोलाड, 17 वर्ष मुले प्रथम क्रमांक सानेगुरुजी विद्यानिकेतन, द्वितीय सानेगाव आश्रमशाळा, 17 वर्ष मुली प्रथम रा. ग. पोटफोडे खांब, विरझोळी हायस्कुल,19 वर्ष मुले प्रथम मेहंदळे हायस्कुल रोहा, द्वितीय शासकीय आश्रम शाळा सानेगाव,19 वर्ष मुली प्रथम मेहंडळे हायस्कुल रोहा, द्वितीय जिंदल माउंट लिटेरा सुकेळी या साळेने पटकावला.

Exit mobile version