खंडूशेठ राणे यांचे निधन

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील पाटणसई येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक खंडूशेठ राणे (वय 100) यांचे नुकतेच वयोवृद्धत्वामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तुकाराम, महादेव (बंधू), प्रल्हाद, चंद्रकांत हे चार विवाहित मुलगे, शैलजा शंकर ठोंबरे ही विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत खंडूशेठ राणे यांनी जुन्या काळात पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून चांगल्याप्रकारे काम केले होते. खंडूशेठ राणे यांचे उत्तरकार्य मंगळवारी (दि.21) पाटणसई येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.

Exit mobile version