| खोपोली | प्रतिनिधी |
सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम असतानाच अतिवृष्टी काळात इर्शालवाडी सारखी दुर्घटना घडून यासाठी नगरपरिषद प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी नागरिकांची भेट घेवून सुरक्षितस्थळी व्यवस्था करीत असल्याचा विश्वास दिले. यादरम्यान प्रशासनाच्या अवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर मस्को काँलनीतील इमारतीत 37 कुटूंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच काजुवाडीतील 8 कुटूंब आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.
सुभाषनगर आणि काजुवाडी येथे दरडीचा धोका असल्ये नगरपरिषदेचे प्रशासक,मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी सुभाषनगरमधी नागरिकांची भेट गणेश मंदीर तसेच वासरंग शाळेत व्यवस्था करीत असल्याचे आवाहन करीत होते. यासंबंधीचे नोटीसही पालिकेने दिली होती. मात्र नागरिकांनी सुचविल्याप्रमाणे मस्को कॉलनीतील इमारत ठरविण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी दुरे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्यावर जागा उपलब्ध झाली. त्यानंतर नगरपरिषदेने युध्दपातळीवर वीज,पाणी,स्वच्छता करीत इमारतीची डागडुजी केली आहे. त्यानंतर सुभाषनगर मधील 37 कुटूंबांना स्थलांतर करण्यात आले आहे. काजुवाडी येथील दरडग्रस्त कुटूंबांना स्थलांतर करण्यासाठी मुख्याधिकारी दुरे यांनी विनवणी केली. यावेळी नातेवाईकांकडे राहण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सुभाषनगर मधील लोकांना स्थलांतर करण्यासाठी उपमुख्याधिकारी गौतम भगळे, नोडल आँफीसर प्रविण भोई, अनिल वानी, विनय शिपाई, सुरेश तारडे, विश्वनाथ फावडे, सतिश हडप, राहुल महाडीक, राजेश मोते, स्वप्निल लाटे, संतोष घोडविंदे, लक्ष्मण पाटील, चेतन कांबळे यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
सुभाषनगर आणि काजुवाडीतील अतिधोकादायक कुटूंबांना स्थलांतर करण्यासाठी नगरपरिषद गेली दोन महिन्यापासून प्रयत्न करीत होती नोटीस देऊन नागरिकांना सुचना करती होतो. पाच दिवसांपूर्वी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी ठरविलेल्या मस्को कंपनीच्या इमारतीत पुढील चार महिने राहण्याची सोय केली आहे. अजून उर्वरीत कुटूंबांना स्थलांतर करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे.
अनुप दुरे, मुख्याधिकारी, प्रशासक