अपहरण झालेल्या बालिकेचा चार तासात शोध

तळोजा पोलिसांकडून आरोपीला अटक
| पनवेल | वार्ताहर |
तळोजा पोलीसांनी अवघ्या 4 तासात 4 वर्षीय 11 महिन्याच्या अपहृत मुलीचा शोध घेतला असून या सदर मुलीचे अपहरण करणार्‍या नराधमाच्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेऊन काही तासातच त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. तळोजा परिसरातून एका चार वर्षीय बालिकेचे अपहरण गॅरेज मध्ये काम करणार्‍या प्रमोद राम बहाद्दूर महतो (वय 30) याने केले होत तसेच तो पसार झाला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2 पनवेल पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग,भागवत सोनवणे यांना तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर इसमा विरोधात गुन्हा नोंद करून पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळया 4 पथक तयार करून घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासणे, मोकळी मैदाने तपासणे, निर्जन स्थळ तपासणे, तांत्रीक तपास करणेबाबत सुचना दिल्या व शोध चालू केला. त्यावेळी आरोपी हा त्याची स्कुटी नंबर 1980 यावरून अल्पवयीन मुलीस घेवून गेल्याचे निष्पन्न झाल्याने सदर स्कुटीचा सुध्दा शोध घेण्यास सर्व पथकाला सुचना दिल्या.

अपहृत मुलीचा शोध घेत असताना आरोपीची स्कुटी नं एमएच 46 बीसी 1980 ही भुयारी मार्गाच्या जवळील मेट्रो ब्रीज येथे मिळून आली. त्यानंत ओसाड व रानटी वाढलेल्या गवतामध्ये अंधारामध्ये शोध घेण्यासाठी पोलीस टिम तसेच पोलीस ठाणेकडील जास्तीत जास्त पोलीस अंमलदार बोलावुन घेतले तसेच स्थानिक समाजसेवेचे काम करणारे नितेश पाटील, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी व कासम मुलानी यांचे व त्यांचे सोबतचे इतर नागरीकांच्या मदतीने बॅटरीचे सहाय्याने तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडील व आर.ए.एफ बटालियन कडील डॉगस्कॉडव्दारे पाहणी करून शोध चालू केला.

या गुन्ह्यातील आरोपीने सदर ठिकाणी पोलीस व नागरीक कसुन तत्परतेने पाहणी करीत असल्याचे पाहून सदर अल्पवयीन मुलीस कोणतीही इजा न पोहचविता घाबरून सदर अपहृत मुलीस मेट्रो ब्रिजचे खाली अंधारात सोडुन पोबारा केला. अपहृत मुलगी मेट्रो ब्रिजचे खाली सुखरूप मिळुन आली, आरोपी हा तळोजा फेज 1 भागात दिसुन आल्याची गोपनिय खबर प्राप्त झाल्याने गुन्हेप्रकटीकरण पथकाने सापळा रचून 10 तासांचे आत त्याचा शोध घेवून ज पहाटे अटक केली आहे.

Exit mobile version