। पुणे । प्रतिनिधी ।
कौटुंबिक वादातून एकाने पत्नीवर कात्रीने वार करुन खून केल्याची घटना बुधवारी (दि.22) पहाटे खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसंनी पतीला अटक केली. ज्योती शिवदास गिते (28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आराेपी शिवदास गिते मूळचा बीडमधील असून तो न्यायालायात टंकलेखक आहे. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. बुधवारी पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.