। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील लाडवली गावात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालयामधील विद्यार्थिनी या तीन महिने वास्तव करून शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच प्रमाणे कृषीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याची माहिती कृषीकन्येने दिली.
या गावात तीन महिने वास्तव्य करून कृषीकन्या येथील शेतकर्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यासोबत कृषीचे प्रात्यक्षिक अनुभवणार आहेत. चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले विदयार्थी सध्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि औदयोगिक संलग्नता 2022-23 अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी गावा गावातील शेतकर्यांच्या थेट घेण्यासाठी शेतावर जात आहेत. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. शिवणेकर व्ही. जे, प्रा पवार व्ही. आर, दिवाळे एस.एस, यांच्या मार्गदर्शनाखाली गट कार्यरत आहे. या गटातील विदयार्थीनी सायली म्हात्रे , मानसी मोरे, ऐश्वर्या पाकटे, भक्ती पवार, निकीता पवार, ऋतुजा साळुंखे, सानिका समजिसकर, सोनल तांबडे अक्षदा ताम्हाणे या विद्यार्थिनी शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी कृष्णा शिंदे, अंकिता कापडी, किशोर मांडवकर, इलियास ढोकले, मेघा शेठ तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.