। अलिबाग । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील महिला या नाविन्य उपक्रमातून एकत्र याव्यात, यासाठी कृषीवलच्या माजी व्यवस्थापकिय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाराने खालापूर फाटा येथील कटरमल मैदानात हळदीकुंकू सोहळा बुधवारी (दि.29) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, सर्व स्तरातील महिलांना एका छताखाली आणण्याचे काम गेल्या 30 वर्षापूर्वी कृषीवलने केले आहे. आज हा सोहळा महाराष्ट्रात नंबर वन ठरत असल्याचा आनंद आहे. गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खालापूरमध्ये हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आल्याचा आनंद आहे. कृषीवलने कायमच परंपरा, सण उत्सव आणि महिला एकत्रिकरणावर भर देण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. बातमीच्या रुपात शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य विशेष म्हणजे महिलांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्याचे काम कृषीवलने केले आहे. महिला, मुली सर्व क्षेत्रात पुढे गेल्या पाहिजेत, या भूमिकेतून काम केले जात आहे. या समारंभात सोनाली पवार यांचे नृत्यांचे सादरीकरण कायमच आकर्षण ठरले आहे. या कार्यक्रमाची खरी शोभा सोनाली पवार यांच्यामुळे वाढत आहे. हा कार्यक्रम कृषीवलने आयोजित केला असला तरी शिवानी जंगम व त्यांच्या टीमने या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, असे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
महिलांचा उत्साह द्विगुणित
गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कृषीवलमार्फत हळदीकुंकू समारंभाचे आयोजन खालापूर मध्ये करण्यात आले. नगरपंचायतीच्या माजी अध्यक्षा शिवानी जंगम यांच्या नेतृत्वाखाली रणरागिनी ग्रुपने अतिशय चांगल्या पद्धतीने कामाचे नियोजन केले होते. खालापूर मधील हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून वाण लुटले. संपूर्ण परिसर महिलांनी गजबजला होता. महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद यातून दिसून आला. हळदीकुंकू समारंभाबरोबरच वेगवेगळ्या गाण्यांचे व नृत्याचे सादरीकरणामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झालेले चित्र पहावयास मिळाले.

कृषीवलच्यावतीने खालापूर, अलिबाग, रोहा व पाली या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ घेतला जात आहे. या समारंभाची उत्सुकता कायमच महिलांना लागून राहिली आहे. खालापूरमध्ये हळदी कुंकू समारंभात दरवर्षी आवर्जून येते. चित्रलेखा पाटील, शिवानी जंगम यांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमात याही वर्षी येण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेरी आल्याचा आनंद निर्माण होतो.
सोनाली पवार