• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

चित्र आशादायी आहे…

Varsha Mehata by Varsha Mehata
January 27, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
646
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा.डॉ. मुकुंद गायकवाड

भारतात परदेशी विद्यापीठे येणार असल्याची बातमी आशादायक आहे. मात्र त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधांबरोबरच संशोधनाचं संपूर्ण स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. कदाचित ही विद्यापीठे ‘इमेरेटस प्रोफेसर’ ही संकल्पना राबवून भारतातील निवृत्त पण कार्यक्षम संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या बुद्धी आणि कौशल्याचा वापर करुन घेतील. ही बाबही लाभदायक ठरणार आहे. म्हणूनच होवू घातलेल्या या बदलाकडे आशेने पहायला हवे.

सध्या भारतात सर्वात चर्चेचा विषय परदेशी विद्यापीठे इकडे येणे हा आहे. आपल्याकडे परदेशी विद्यापीठे येणार असल्यामुळे नेमका काय बदल होईल याचे भाकित अनेकजण वर्तवताना दिसत आहेत. मी 80 देशांमधील विद्यापीठे जवळून पाहिली आहेत. त्यांचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यापीठांनी नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ निर्माण केले, पण भारतातील एकाही विद्यापीठाला ते शक्य झालेले नाही. परदेशांमधील विद्यापीठांना ते का शक्य झाले? या प्रश्‍नांचे उत्तर म्हणजे तेथील उद्योगपती आपल्या उद्योगाला आवश्यक असणारे संशोधन भरपूर पैसे देऊन आणि मदत करुन विद्यापीठाकडून करवून घेतात. आपल्याकडील एक उदाहरण द्यायचे म्हटले तर सिरम इन्स्टिट्युटच्या पुनावाला यांनी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाला संशोधनासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. असं असताना त्यांना भारतातील एकाही विद्यापीठाला देणगी का द्यावीशी वाटली नाही, हा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील शिक्षण बंधनमुक्त झाले आणि त्यातून गावोगावी आणि प्रत्येक शहरात शिक्षणसम्राट उदयाला आले. या पर्वानंतर आता परदेशी विद्यापीठांना भारतातील दारे खुली झाली आहेत किंवा त्यांच्यासाठी भारताचे रान मोकळे झाले आहे. काहींच्या मते, ही विद्यापीठे इथे पैसे कमावण्यासाठी येतील. पण याबाबत एक वेगळे मत आहे. जगातील अनेक बुद्धिमान लोक अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्या देशाच्या समृद्धीचे कारण ठरले ते तेथील आघाडीच्या शिक्षणसंस्थांमुळेच. कोणत्या शिक्षणप्रणालीसाठी विद्यार्थी अमेरिकन विद्यापीठांकडे धाव घेत आहेत, याचा विचार करता इंजिनिअरिंगसाठी कोणी तिथे जाताना दिसत नाही तर भारतीय विद्यार्थी अमेरिकेमध्ये गणित आणि संगणकीय शास्त्रातील शिक्षणासाठी वळले आहेत. 2009-10 मध्ये अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांपैकी 40,700 विद्यार्थ्यांपैकी 38.08 टक्केविद्यार्थी संगणकीय कौशल्य मिळवण्यासाठी तिकडे गेले होते. 2021-22 मध्ये गणित आणि कॉप्युटर सायन्स या विषयात शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण 36.07 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचले. दरम्यानच्या काळात अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,99,182 पर्यंत वाढली. 2010 मध्ये 20 टक्के अमेरिकन लोक कारखान्यांमध्ये काम करत होते. 78 टक्के लोक शिक्षक, डॉक्टर्स, वेब साईट डिझायनर, कॉम्युटर सायन्समधील कामे करत होते आणि केवळ दोन टक्के लोक शेती करत होते. आता भारतात या शिक्षणसंस्था नेमके कोणते अभ्यासक्रम सुरू करतील हे पहावं लागेल कारण ते निश्‍चितच  इथे शेतीविषय अभ्यासक्रम सुरू करणार नाहीत.
भारतातील डीम विद्यापीठे परदेशांमधील विद्यापीठांच्या मानाने महागडी आहेत असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. येथील उच्च शिक्षण किती लोकांना परवडते, या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी अलिकडच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील आकडेवारी बोलकी आहे. त्यात म्हटले आहे की, पाच टक्के भारतीयांकडे देशातील 62 टक्के संपत्ती एकवटली आहे आणि तळातील 50 टक्के लोकसंख्येमध्ये फक्त तीन टक्के संपत्ती आहे. म्हणजे डीम विद्यापीठातील शिक्षण 80 टक्के लोकांच्या आवाक्याबाहेरील आहे. अमेरिका वा इतर प्रगत देशांमधील उद्योगधंदे मनुष्यबळासाठी तेथील विद्यापीठांवर अवलंबून असतात. परंतु भारतीय विद्यापीठे, डीम विद्यापीठे फक्त पदव्यांच्या पाठीमागे धावताना दिसतात. जागतिक स्तरावर संशोधनासाठी किंवा नवनवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी भारतातील एकाही विद्यापीठाने नाव कमावलेले नाही. फक्त परदेशी विद्यापीठांची नक्कल करणे एवढेच एक ध्येय ठेवल्यामुळे असेल पण, जगातील पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही ही सगळ्यात लाजिरवाणी बाब आहे.
आपल्या देशात परदेशी विद्यापीठे आल्यामुळे येथील शिक्षणसम्राटांना निश्‍चितच शह बसणार आहे. कदाचित परदेशी विद्यापीठे येथील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळे अभ्यासक्रम आखण्याचा अंदाज आहे. परदेशातील काही आधुनिक अ‍ॅप्सचा अभ्यास केला असता जगात सगळीकडे पोहोचलेल्या स्टारफोनमध्ये काही अचाट गोष्टी दिसल्या. जगभरात निवृत्त झालेली बरीच कौशल्ययुक्त माणसे आहेत. त्यांचा वापर करुन स्वस्तात शिक्षण कसे देता येईल, यासंबंधीची अनेक अ‍ॅप्स परदेशी विद्यापीठांनी तयार केली आहेत. आपल्याकडे कौशल्य नव्हते असे नाही. बारा बलुतेदारांमध्ये अमाप कौशल्य होते. एके काळी भारतात सुवर्णकाळ नांदत होता, आपले उत्पन्न जगातील एकूण उत्पन्नाच्या 18 टक्के होते, परंपरागत शिक्षणपद्धती होती. पण ब्रिटीशांनी ती मोडून काढली.
आता कदाचित परदेशी विद्यापीठे त्यांच्या स्वार्थासाठी ‘स्मॉल इज ब्युटिफूल’ हे तत्त्व वापरुन व्यावसायिकांच्या दृष्टीने संशोधनावरील काही अभ्यामक्रम सुरू करतील, कारण ते आपला अभ्यासक्रम दरवर्षी बदलत असतात. तसा विचार केला तर काही नावाजलेल्या विद्यापीठांनी जगात कुठेही आपल्या शाखा उघडलेल्या नाहीत, कारण ते दर्जाबाबत अत्यंत काळजी घेतात, आग्रही असतात. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज ही एक हजार वर्षांपूर्वीची विद्यापीठे आपल्या प्रथा काळजीपूर्वक सांभाळून, संशोधनाच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप सहन करत न करता संशोधकाला काहीही कमी पडू देत नाहीत. तिथले विद्यापीठप्रमुख आपले कोणतेही विचार संशोधकांवर लादत नाहीत.
याउलट आपल्याकडील विद्यापीठे हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. आजही आपल्याकडचे संशोधन अभ्यासक्रम मंडळाची मान्यता घेणे, कुलगुरूंची मान्यता घेणे, युजीसीची मान्यता घेणे अशा प्रक्रियेमध्ये अडकले आहे. याउलट परदेशात संबंधित व्यक्तीची कोणतीही कल्पना असली तरी तिचा आदर करुन अमर्याद सोयी पुरवण्यास प्राधान्य दिले जाते. परदेशात ‘इमेरेट्स प्रोफेसर’ ही कल्पना रुजली आहे. आईन्स्टाईनला जर्मनीतून हाकलून दिल्यानंतर अमेरिकेतील क्रिस्टन विद्यापीठाने त्याच्यासाठी हा शब्द आणि परंपरा निर्माण केली. आज सर्व विद्यापीठांनी ती स्विकारली आहे. या अंतर्गत ही विद्यापीठे चांगल्या संशोधकाला त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सांभाळतात, हवा तेवढा निधी उपलब्ध करुन देतात. यामागील कल्पना अशी की निवृत्त शास्त्रज्ञ आणि त्याची प्रगल्भता वयाबरोबर वाढत असते. तिचा लाभ संशोधक संस्थेला आणि इतरांना मिळवून देण्यासाठी ही योजना अत्यंत लाभकारक ठरली आहे.  याउलट एखादा माणूस कितीही बुद्धिमान असला तरी आपली विद्यापीठे आणि युजीसी निवृत्तीचे वय झाले की बाहेरचा रस्ता दाखवतात. भारतातील एकाही विद्यापीठामध्ये अमेरिकेसारखे ‘इमेरेटस प्रोफेसर’ दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित अमेरिकन विद्यापीठे येथील निवृत्त होऊन घरी बसलेल्या नामवंत शास्त्रज्ञांना नव्याने कामाची संधी देण्याची शक्यता दिसते. अमेरिकन विद्यापीठे ‘नेव्हर गिव्ह अप’ वा ‘नेव्हर से डाय’ या तत्त्वाने वागतात. नव्या कल्पनेसाठी ती नेहमीच हपापलेली असतात. त्यामुळे भारतात या विद्यापीठांद्वारे आर्थिक क्रांती होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांचे स्वागत करायला हवे.
ही विद्यापीठे त्यांचे स्वतंत्र परिसर तयार करतील की येथील डीम विद्यापीठांशी भागीदारी करतील याचा अंदाज अद्याप आलेला नाही. स्वतंत्र परिसर निर्माण करण्यासाठी त्यांना मोठी जागा आणि वीज, पाणी आदी सुविधा लागतील. भारत सरकार त्यांना हे सर्व देण्यास तयार आहे का, याचा खुलासा युजीसीच्या घोषणेमध्ये दिसत नाही. भागीदारी करुन फक्त त्यांच्या नावाच्या पदव्या दिल्या तर कौशल्य निर्माण होणार नाही.
म्हणूनच भारत सरकारने त्यांना अमेरिकेत असतं तसं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य दिलं तरच खरी प्रगती होऊ शकेल. 1862 मध्ये अब्राहम लिंकन अध्यक्ष असताना अमेरिकेत अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ‘लँड ग्रँड विद्यापीठे’ निर्माण केली. म्हणजेच एकेका विद्यापीठाला हवी तेवढी जमीन फुकट देऊन टाकली.
पुढे त्यावर उभारलेल्या संस्थांमध्ये प्रचंड संशोधन झाले आणि अमेरिकेने जगातील शेतीक्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला. याच लँड ग्रँड विद्यापीठांनी आपल्यामध्ये जगाला धान्य पुरवण्याइतकी क्षमता निर्माण केली. सारांश, विद्यापीठे आणि संशोधन हेच देशाला सामर्थ्यवान बनवतात, हे तत्त्व अमेरिकेने सिद्ध केले आहे. आपणही होऊ घातलेल्या या बदलाकडे आशेने बघायला हवे.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

बुडाला तर बेडूक

Next Post

जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विदयापिठची डि.लिट. पदवी सचिनदादा धर्माधिकारी यांना जाहीर

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विदयापिठची डि.लिट. पदवी सचिनदादा धर्माधिकारी यांना जाहीर

जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विदयापिठची डि.लिट. पदवी सचिनदादा धर्माधिकारी यांना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?