रौप्य महोत्सवी वर्षाची शानदार सुरुवात!
। अलिबाग । वार्ताहर ।
क्षात्रैक्य समाज अलिबागचा वर्धापनदिन कुरुळ येथील भव्य सभागृहात संपन्न झाला. प्रारंभी ग.चि .पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, शालिनी राणे पुरस्कृत दत्तात्रय राणे दालनाचे उद्घाटन तसेच कृषिभूषण जयवंतराव चौधरी यांच्या गौरव विशेषांकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
समाजासाठी कार्य करणार्या डॉ. नीला व देवराव पाटील यांना स्व. कौशल जयवंत चौधरी क्षात्रैक्य जीवन गौरव तर स्व. कृष्णाजी नाईक तसेच स्व. सुमती कृष्णाजी नाईक क्षात्रैक्य भूषण पुरस्काराने अनुक्रमे श्रीकृष्ण सावरकर व सुधीर बळीराम म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. ‘स्व भागिरथी वामन नाईक कृषिनिष्ठ पुरस्कार’ कार्ले येथील कांदे उत्पादक शेतकरी सतीश म्हात्रे यांना देण्यात आला. याचबरोबर के.डी.पाटील, अभय घरत, महेश कवळे, डॉ. सुचिता पाटील, भूपेंद्र पाटील, संजय गुंजाळ, प्रभाकर नाईक, विलास नाईक, महेश पाटील, कला पाटील, विजय म्हात्रे व इतर अन्य समाजबांधवांसह इयत्ता दहावी आणि बारावीतील विशेष प्रावीण्य मिळवणार्या गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी उपस्थितांमध्ये प्रमुख पाहुणे बोरिवलीचे विकसक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीचे संचालक प्रकाश पाटील, डॉ रामदास माळी, जयवंतराव चौधरी, समाज अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मनिषा कोटक, वामन पाटील, सचिव प्रदीप नाईक, श्रीकांत पाटील, रवींद्र वर्तक, मनोज राऊळ, अविनाश राऊळ, श्रीनाथ कवळे, महेश कवळे, प्रकाश पाटील, कार्यकारिणी सदस्य रमेश नाईक, अॅड. समाधान पाटील, अॅड. विलास नाईक, अॅड प्रसाद पाटील उपस्थित होते.