| तळे | वार्ताहर |
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी निवासी शिबीर उद्घाटन सोहळा वाशी हवेली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के लाभले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी भूषविले. तसेच या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉ. श्रीनिवास वेदक हे होते. यावेळी कार्यकारी मंडळाचे सदस्यदीपक कोटिया, महादेव बयकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बी. के. पटेल, वाशी हवेली गावचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा, माजी सरपंच, ग्रामस्वच्छता कमिटी, नळ पाणी पुरवठा कमिटी, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे, पदाधिकार्यांचे स्वागत केले. हे निवासी शिबीर दि.4 जानेवारी ते 10 जानेवारी असे सात दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. कुंटेवाड यांनी केले. प्राचार्य मनोगत डॉ. नानासाहेब यादव यांनी केले. तसेच मारुती शिर्के, पुरुषोत्तम मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियान या अभियानांतर्गत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला मंडळ वाशी हवेली विद्यार्थी आणि ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वाशी हवेली ग्रामस्थ, महिला मंडळ, महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.