लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; पुढील उपचारासाठी दिल्लीला हलवणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आज दिल्लीत जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहणार आहेत. लालू यादव सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. पाटण्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांची प्रकृती स्थिर आहे.

Exit mobile version