। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच अभिजित अशोक पाटील यांच्या मातोश्री लता अशोक पाटील, कुरुळ ग्रामपंचायत मा. सदस्य प्रज्ञा अभिजित पाटील यांच्या सासू यांचे अल्पशा आजाराने 30 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर 31 डिसेंबर रोजी कुरुळ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाच्या लता अशोक पाटील निधनासमयी 62 वर्षांच्या होत्या.
लता पाटील यांच्या अंत्ययात्रेला अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी, कुरुळ येथील ग्रामस्थ, मा. सरपंच, सदस्य, नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या पश्च्यात पती अशोक पाटील, मुलगा अभिजित पाटील, मुलगी अनिशा दरणे, सून, नातवंडे असा मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशविधी कार्य (दहावे) बुधवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता कुरुळ तलाव येथे होणार आहेत.
निधनाची बातमी समजताच शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश पाटील, ग्रामपंचायत मा. सदस्य अवधूत पाटील, मा. सदस्य रेश्मा पाटील, मा. सदस्य वृषाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, सतिश पाटील, अमोल नाईक, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच आणि इतर राजकीय पक्षाची मंडळी यांनी घरी जाऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.