। अलिबाग । वार्ताहर ।
स्व. प्रभाकर पाटील व्यावसायिक चषक भव्य कबड्डी स्पर्धा मातृछाया क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी कबड्डीपटू रामचंद्र नारायण केणे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह तथा जिल्हा परिषदेचे गटनेते अॅड. आस्वाद पाटील, माजी आमदार पंडित पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, रा.जि.प सदस्या चित्रा पाटील, अध्यक्ष सुनील पिंगळे, उपाध्यक्ष सूर्यकांत केणे, भगवान पिंगळे, काशिनाथ पिंगळे, विश्वनाथ पिंगळे, संतोष पिंगळे, अरुण पाटील, शाम पिंगळे, प्रशांत पाटील, अर्विण पाटील, अमोल पाटील, नयन बांधनकर, संदीप सुतार व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.