कामोठ्यात नफरत छोडो, भारत जोडोचा नारा

| पनवेल । वार्ताहर ।

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या भारत जोडो यात्रेनंतर देशभरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरू झाले आहे. या अभियानाची पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी (दि.12) संध्याकाळी कामोठ्यात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नफरत छोडो, भारत जोडोचा गजर करीत रॅली काढण्यात आली. या दरम्यान नागरिक, दुकानदार, व्यावसायिकांना राहुल गांधी यांनी केलेल्या आवाहनाची जनजागृतीपर पत्रके वाटण्यात आली. हा कार्यक्रम पुढील दोन महिने चालू राहणार आहे.

हात से हात जोडो अभियान दि. 26 जानेवारी पासून सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे आवाहन पत्र, स्टिकर व भाजप सरकार विरोधातील चार्जशिट जनतेमध्ये वितरित करण्यात येत आहे. या पत्रकामध्ये जलप्रदूषण, वायुप्रदूषण, खराब रस्ते, शौचालयाची दुरवस्था, घनकचरा विल्हेवाट, अपुरा पाणी पुरवठा, वाढीव मालमत्ता कर, अवजड वाहनांचा त्रास, वाढीव वीजदर, पार्किंगची असुविधा,बेरोजगारी, ईडी, सीबीआय, इन्कम टॅन्कस सारख्या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग, जाती धर्मातील तेढ या विषयावर जनजागृती करण्यात आली आहे. याप्रसंगी मालमत्ता कर, पाण्याची आणि घनकचर्‍याची समस्या, विजेचे वाढलेले दर याबद्दल लोकांच्या मनात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेतील अनागोंदी कारभाराबद्दलही जनजागृती करण्यात येणार आहे.

याप्रसंगी कॅप्टन कलावत, नंदराज मुंगाजी, श्रुती म्हात्रे, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंह, मल्लिनाथ गायकवाड, सुरेश पाटील, बबन केणी, नित्यानंद म्हात्रे, माया अहिरे, रघुनाथ पाटील, राहुल जानोरकर, संतोष चिखलकर, अमित लोखंडे, विनीत कांडपीळे, सुदेशना रायते, सुधीर मोरे, डी एस शेट्टी, प्रेमा अपाचा, कपिल यादव, प्रिंतेश शाहू, धनंजय क्षिरसागर जयश्री खटकाले, नीलम पाटील, जयेश लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version