‘आम्हाला जगू द्या’

दिशा सालियानच्या आईला विनंती
। मुंबई । वृत्तसंस्था ।
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियान यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले. दिशा सालियानच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या सदस्य देखील त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर आता दिशाच्या परिवाराने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आम्ही इतकं सारं सहन करतोय. खूप त्रास झाला आम्हाला. राजकारणामुळे आम्हाला या लोकांमुळे आम्हाला जगण्याची इच्छा नाही. आता आम्हाला काय झालं तर यांची जबाबदारी असेल कुणीही नेते, अभिनेते असाल तर आम्हाला त्रास नका देऊ असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. यावेळी दिशा सालियानच्या आईला अश्रू अनावर झाले. आता आम्हाला सोडा, आम्हाला जगू दे, सर्वांनाच कळकळीची विनंती करते की आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही नेत्यांसाठी मते देतात. पण हे लोक आम्हाला आणि मुलीला बदनाम करतात. ती गेली, त्याचं दु:ख आम्ही झेलतोय. पण तिला बदनाम का केलं जातंय. आम्हाला आता पुन्हा त्रास देऊ नका. मी हीच विनंती करेन की त्रास नका देऊ, एकच मुलगी होती. आम्हाला जगू द्या इतकंच सांगेन असं पुन्हा पुन्हा दिशा सालियानच्या आई वडिलांनी सांगितलं.

Exit mobile version