‘थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेऊ’; शिवसेना आक्रमक

। मुंबई । वृत्तसंस्था ।

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मुद्दा ताणला जात आहे. शिवसेनेतल्या बंडाचा फटका दसरा मेळाव्यालाही बसला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा यासाठी शिवसेनेसह शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र महापालिकेने अद्याप शिवाजी पार्क मैदानाबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे बीकेसीमधल्या दोन मैदानांसाठी दोन्ही गटांनी अर्ज केले होते. त्यातल्या शिंदे गटाचा अर्ज पालिकेने स्विकारला असून ठाकरेंचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मात्र, हा गोंधळ आता आणखी वाढला तर शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा आहे. आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे. महापालिकेने जर प्रकरण ताणलं तर थेट मैदानात जाऊन मेळावा घेण्याची तयारीही शिवसेनेने दाखवली आहे.

Exit mobile version