। उरण । दिनेश पवार ।
उरण तालुक्यातील करंजा येथील अमर थळी यांची दररोज २० लिटर दूध देणारी गाय पोट फुगीच्या आजाराने ग्रस्त होती. तब्बल10 दिवस गायीवर उपचार सुरु होते. सलाईन, औषधे देऊनही काहीच सुधारणा होत नसल्याने उरण तालुक्यातील पशुवैद्यांनी मेटल डिटेक्टरने गाईची तपासणी केली. ही तपासणी केली असता गाईच्या पोटात अखाद्य मेटल वस्तू असल्याचे समजले.
डॉ.सोमनाथ भोजने, डॉ.महेश शिंदे, डॉ.महेश सावंत, डॉ.अनिल धांडे या डॉक्टरांनी मंगळवार ( दि. २६ ) गाईचे ऑपरेशन करून तिच्या पोटातून तब्बल 20 किलो प्लास्टिक ब्लेड, नाणी, स्क्रू, नट बोल्ट, धातूचे अलंकार आदी वस्तू पोटातून बाहेर काढून गोमातेचे प्राण वाचवले आहेत.
‘प्रदूषणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर करू नका’ अशी जनजागृती शासन नेहमीच करीत असते. प्लास्टिक कुजत नाही. प्लास्टिकचा खाल्य्याने अनेक जनावरे मेली आहेत. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा.
डॉ.अनिल धांडे, पशुधन अधिक्सरी पंचायत समिती उरण