लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीतर्फे 500 झाडांच्या लागवडीचा संकल्प

। उरण । वार्ताहर ।
उन्हाळी हंगाम सुरू झाला असून वातावरणातील बदलामुळे येत्या काही दिवसांत अधिक गरमीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी उरणच्या आजूबाजूच्या परिसरात 500 झाडांची लागवड लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. उन्हाळा सुरू झाल्याने फळांचा राजा आंब्याचा हंगामही सुरू झाला आहे. आंबे खांल्यानंतर बिया फेकून देऊ नका, पाण्याने स्वच्छ धुवा आणि सर्व बिया एका बॅगमध्ये गोळा करा आणि आम्हाला द्या. आम्ही त्या सर्व बियांचे नियोजन करू आणि ते वृक्षारोपणाच्या दिवशी लावू. केवळ झाडे लावणेच नाही तर आपल्या भविष्यासाठी त्यांचे जतन करणे हा आमचा उद्देश आहे. चांगल्या पर्यावरणासाठी हे आमचे एक पाऊल आहे आशा आहे की तुम्ही सर्व आम्हाला मदत कराल असे नम्र आवाहन अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी नागरिकांना केले आहे. अधिक माहितीसाठी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे अध्यक्ष संदीप म्हात्रे 98211 42202, भूमिका सिंग 98675 77669, मोनिका चौकर 9226208625, सुषमा काळे 8291446203 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version